शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर - संपूर्ण तंत्रज्ञ, अभियंते, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिक यांचे दैवत आणि वास्तू, यंत्रनिर्मिती तसेच तंत्रशास्त्राच्या क्षेत्रातील प्रेरणास्थान म्हणजे श्री विश्वकर्मा. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यंत्र अभियांत्रिकी विभागात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली.
हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेव यांनी सजीव सृष्टी निर्माण केली, तर प्रभू श्री विश्वकर्मा यांनी यंत्र, वास्तू व आजीव सृष्टी निर्माण केली. त्यामुळे तंत्रशिक्षण, यांत्रिकी, निर्माणकाम व अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत सर्वजण त्यांना आपले दैवत मानतात. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि पुष्प अर्पण करून करण्यात आली.
यावेळी विभागप्रमुख प्रा. जे. डी. धोटे, प्रा. बाळासाहेब पाटील, प्रा. डॉ. भारतभूषण घोटावडेकर, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. योगेश सातपुते, प्रा. अमोल पाटील, प्रा. अरिफ शेख, प्रा. सुखदेव वाघमोडे, तसेच निदेशक विनोद कांबळे, संजय पाटील, विजय परदेशी, भांडारपाल सचिन नलावडे आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी दत्ता सुतार यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परशुराम चव्हाण व यशवंत गुरव यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि स्वागत केले.