इचलकरंजीत घनकचरा प्रकल्प बंद असल्याने परिसरात दुर्गंधी

 

 

इचलकरंजीत घनकचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर....

<p>इचलकरंजीत घनकचरा प्रकल्प बंद असल्याने परिसरात दुर्गंधी</p>

<p> </p>

इचलकरंजी- शहरात गेल्या चाळीस दिवसांपासून महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे. प्रकल्प बंद असल्याने कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. सुमारे ७ हजार टन सध्याचा कचरा आणि पूर्वीपासून जमा झालेला तब्बल एक लाख टन कचरा जागीच साचून राहिलाय. कचऱ्याच्या या साठ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने प्रकल्पाची पाहणी केली. पाहणी दरम्यान दररोज सुमारे १३० ते १५० टन कचरा जमा होत असून या कचऱ्यामध्ये ३० ते ४० टन इतका सुका कचरा तर उर्वरित कचरा ओला कचरा असल्याचे निदर्शनाला आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळांने केलीय. सोमवारपर्यंत हा प्रकल्प सुरू करून कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यात यावे, अन्यथा मंगळवारी मनसेने महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलाय.

या पाहणीदरम्यान शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे, शाखा उपाध्यक्ष दीपक तिप्पे, स्वधर्म गोविंदा पथकाचे अध्यक्ष तन्मय तांबे तसंच स्थानिक नागरिक उपस्थित होते.