संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबरला माणगावमध्ये विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार...
कोल्हापूर - स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी बिग्रेड यांच्या वतीने संविधान दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हयातील ऐतिहासिक माणगाव गावात राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेव आंबेडकर यांची, अडीच लाख चौरस फुटांची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार आहे.
संविधान दिन एकता समिती आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या सहयोगातून २६ नोव्हेंबरला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आशा चव्हाण आणि मोनाली पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिलीय.
कलेची पंढरी असलेल्या कोल्हापूरातील कलाकारांसाठी या विश्वविक्रमात सहभागी होण्याची ही संधी आहे. या रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्याचा संस्थेचा मानस असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या रांगोळीसाठी १२ वेगेवेगळ्या रंगाचा वापर करण्यात येणार असून यासाठी ३५ टन रांगोळी लागणार आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रांगोळीच्या माध्यमातुन आपल्या कोल्हापूरचा नाव लौकीक व्हावा, कलेला चालना मिळावी यासाठी सामाजिक संघटना, बचत गट आणि तरूण मंडळांनी यामध्ये सहभागी होवून रांगोळीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आलय. या पत्रकार बैठकीला पूनम बोंद्रे, पूजा आरडे, मधु म्हेत्तर, अनुराधा लोहार, समीर काळे आदी उपस्थित होते.