कॉलेजच्यावतीने कळंब्यातील मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन...

<p>कॉलेजच्यावतीने कळंब्यातील मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन...</p>

कोल्हापूर - श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित न्यू कॉलेज यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. कळंब्यातील मध्यवर्ती कारागृहात जाऊन महाविद्यालयीच्या विद्यार्थिनींनी शंभर बंदी बांधवांना राख्या बांधल्या.

 यावेळी बंदीजन भारावून गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रकांत देवकर होते. यावेळी बोलताना चंद्रकांत देवकर यांनी कारागृहामध्ये कैद्याचा बंदी होतो आणि अशा सामाजिक सणामुळे  आणि अभिनव उपक्रमामुळे बंदीचा बंधू होतो. त्यामुळे बहिण भावाचे नातं दृढ करणारा रक्षाबंधन सण विशेष आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. व्ही एम पाटील, डॉ. एस एच पाटील, प्रा. उमेश जाधव, प्रा. आर के पाटील, तुरुंगाधिकारी रमेश मेंगडे, एस डी माने, प्रा. एम बी गडदे, प्रा डी जी पाटील, प्रा अनुप पायमल, डॉ यू व्ही सूर्यवंशी, प्रा. यु व्ही सावंत यांच्यासह विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.