शंभर कोटींचे रस्ते आणि ८५ लाखांच्या ड्रेनेज कामाची चौकशी करण्याची मागणी
वंचित बहुजन आघाडी

कोल्हापूर - महानगर पालिका प्रशासनाने ८५ लाख रुपये खर्चाच्या ड्रेनेज कामांचे कंत्राट मंजूर करून घेतले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे काम झालेले नाही. यामध्ये संबंधित अधिकारी, ठेकेदार यांचीही भूमिका संशयास्पद असून, या ड्रेनेज कामात लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी केला आहे.
शंभर कोटींच्या रस्ते कामाचीही हीच स्थिती आहे. खड्डेमय रस्ते, अपूर्ण कामे आणि नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामातही निधीचा अपव्यय होत आहे. त्यामुळे कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कदम यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला नितीन कांबळे, अमित नागटिळे, आकाश कांबळे, विशाल माने उपस्थित होते.