महादेवी ( माधुरी ) ला नांदणीला परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, नांदणी जैन मठ आणि राज्य सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार- वनतारा प्रशासनाची घोषणा

<p>महादेवी ( माधुरी ) ला नांदणीला परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, नांदणी जैन मठ आणि राज्य सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार- वनतारा प्रशासनाची घोषणा</p>

कोल्हापूर - महादेवी ( माधुरी ) ला नांदणीला परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, नांदणी जैन मठ आणि महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार असल्याची घोषणा वनतारा प्रशासनानं कोल्हापूर मध्ये केली. "माधुरी" हत्तीणच्या बाबतीत जनतेच्या भावना, पर्यावरणीय जबाबदारी आणि न्यायिक प्रक्रिया यांचं सुंदर संतुलन राखत सकारात्मक निर्णयाकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हापुरातील जनतेसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. या याचिकेला पेटा (PETA) आणि एचपीसी (HPC) यांचा पाठिंबा असून, यामध्ये हत्तीणची मालकी नांदणी मठाकडेच राहणार आहे, मात्र वैद्यकीय सेवा आणि देखभाल वनताराकडून केली जाणार आहे.

  1. नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र राज्य सरकार एकत्र येऊन संयुक्त याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. हा एक सकारात्मक टप्पा आहे.
  2. विवान करानी यांनी स्पष्टपणे सांगितले की, हत्तीणचे पुनर्वसन नीट आणि प्रेमाने केले जाईल.
  3. जनतेच्या भावना लक्षात घेऊन हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि "तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल", अशी आश्वासक माहितीही देण्यात आली आहे.
  4. या संपूर्ण प्रकरणात कोणतीही हार-जीत नसून, हत्तीणचा विजय महत्त्वाचा आहे. हा दृष्टिकोन खूपच सकारात्मक आहे.
  5. वनतारा आणि मठ दोन्ही ठिकाणी हत्तीणची चांगली काळजी घेतली जात होती. यामुळे एकमेकांवर दोष न देता, दोघांचाही आदर राखून मार्ग काढण्याचा प्रयत्न दिसतो.

महास्वामींनी सांगितले की, “वनतारासोबत झालेली चर्चा समाधानकारक आहे. माधुरी हत्तीण परत येईपर्यंत वनताराने आम्हाला मदत करावी, अशी आमची विनंती आहे. अनंत अंबानी यांच्या परिवाराने येथे पथक पाठवले असून, त्यांच्या या भूमिकेला आमचा आशीर्वाद आहे.”