आरोग्यासाठी योग, मनासाठी ध्यान आणि विचारांसाठी पुस्तकांशी मैत्रीचा संकल्प करत मैत्री द

प्रफुल्लित केंद्रात अनोखा मैत्री दिन साजरा

<p>आरोग्यासाठी योग, मनासाठी ध्यान आणि विचारांसाठी पुस्तकांशी मैत्रीचा संकल्प करत मैत्री द</p>

कोल्हापूरातील क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकातील प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं अनोख्या पध्दतीनं मैत्री दिन साजरा करण्यात आला. केंद्राच्या अध्यक्षा आणि योग प्रशिक्षिका, डॉ. आल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विशेष योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. 'निरोगी आरोग्यासाठी योग' या संकल्पनेवर आधारित या सत्रात विविध आसनं आणि प्राणायाम घेण्यात आले. योग सत्रानंतर 'आनंदी मनासाठी ध्यान' या संकल्पनेवर आधारित ध्यान सत्र घेण्यात आलं. त्याच बरोबर विविध मनोरंजक खेळांचं आनंद घेत सहभागी महिलांनी मैत्रीचे बंध घट्ट केले. या संपूर्ण उपक्रमां मधील पुस्तकांशी मैत्री करण्याचा संकल्प हा अभिनव भाग होता. या संकल्पने अंतर्गत केंद्रा मध्ये मैत्रीदिनाच्या निमित्त मोफत ग्रंथालय सुरु करण्यात आलं. केंद्राचे संस्थापक, डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मैत्री दिन उपक्रमात रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाफ, श्रावणी पडलकर, क्षितिजा पाटील, श्वेता गुरख यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला.