वनताराचे अधिकारी कोल्हापुरात दाखल...
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू

कोल्हापूर - नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्रामध्ये पाठवल्यानंतर नांदणीकरांसह अन्य लोकांचा महादेवीला परत आणण्याची मागणी केली आहे.. लोकांनी अंबानीच्या वनतारा केंद्राचा निषेध नोंदवत जिओची सेवा वापरणे बंद करण्यास सुरुवात केलीय. जोपर्यंत आमचा महादेवी आम्हाला परत देत नाही, तोपर्यंत जिओ वापरणार नसल्याचा पवित्रा लोकांनी घेतला आहे. महादेवीला परत आणण्यासाठी आ. सतेज पाटील यांच्या पुढाकाराने सह्यांची मोहीम राबवण्यात आलीय. या वाढत्या जन आक्रोशानंतर वनतारा केंद्रामध्ये हालचालींना वेग आला असून वनतारा केंद्राचे अधिकारी आज कोल्हापूरला दाखल झालेत
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने या अधिकाऱ्यांना नांदणीला न पाठवता कोल्हापुरात थांबवण्यात आलंय. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात एककी वनताराच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, खासदार धैर्यशील माने यांची बैठक सुरू आहे