महादेवी हत्तीणी परत येणार..? : सह्यांच्या मोहिमेमुळे वनतारामध्ये हालचालींना वेग

कोल्हापूर – नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यात यावं. यासाठी राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विचार करावा यासाठी आ. सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम सुरु केली आहे. कालपर्यंत एक लाख २५ हजार लोकांनी सह्या केल्याची माहिती आ. सतेज पाटील यांनी दिली. तसेच संध्याकाळपर्यंत एक लाख ७० हजार लोकांच्या सह्या होती. त्यानंतर या मोहिमेतील सर्व सह्यांचे गठ्ठे राष्ट्रपतींना पाठवले जाईल. जेणेकरून लोकमताचा विचार करून राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी माहिती त्यांनी दिली.
सह्यांच्या मोहिमेमुळे वनतारातील यंत्रणांना वेग आला आहे. वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी आणि त्यांची टीम नांदणी मठाला भेट देणार असल्याची माहिती मिळाल्याचेही आ. सतेज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या सह्यांच्या मोहिमेला यश आल्याचे चित्र दिसून येत आहे.