महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम सुरु : आ.सतेज पाटील यांचा पुढाकार

कोल्हापूर – सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नांदणी मठातील माधुरी- महादेवी हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्रात पाठवण्यात आले आहे. परंतु जामनगर येथील वातावरण माधुरी- महादेवी हत्तीणीला सहन होणारे नाही त्यामुळे महादेवीला तिच्या मूळ ठिकाणी म्हणजे नांदणी मठात परत आणण्यासाठी आ. सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम सुरु केली आहे.
या सह्यांच्या माध्यमातून आम्ही भारताच्या राष्ट्रपतींकडे एकच भावनिक साद घालत आहोत “आमच्या माधुरीला तिचं घर, तिची श्रद्धा आणि तिचं कुटुंब परत द्या.” हा लढा फक्त एका प्राण्याचा नाही, तर भावनांच्या आणि श्रद्धेच्या नात्याचा आहे. तुमच्या एका सहीने माधुरीला तिचं प्रेमळ घर परत मिळू शकते, त्यासाठी सह्या करण्याचे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले आहे.