राधानगरी धरण 'इतके’ टक्के भरलं...

कोल्हापूर – कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी हळूहळू कमी होवू लागली आहे. आज सकाळी ९ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारे येथे २४ फुट २ इंचावर होती. जिल्ह्यातील २२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर आज सकाळी सहा वाजता राधानगरी धरण ८१ पूर्णांक ९१ टक्के भरल्याची नोंद झाली आहे.