कोल्हापुरातल्या रस्त्यातील खड्ड्यात टाकलेला मुरूम गेला वाहून...
मनपाचा ढिसाळ कारभार

कोल्हापूर - महानगरपालिकेला रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र या निधीतून केलेल्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. कारण थोड्याशा पावसातही हे रस्ते उखडले आहेत. या रस्त्यावर १० इंचापासून ते ४ फुटांपर्यंत खड्डे पडल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. कधी वाहन खड्ड्यात जावून नियंत्रण सुटेल आणि अपघात होईल हे सांगता येत नाही. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनेही नादुरुस्त होत आहेत. त्यातचं हे खड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आलीय. मात्र पावसामुळे हा मुरूमही वाहून गेलाय. त्यामुळे पुन्हा हे खड्डे उघडे पडल्याने महापालिकेच्या कामाचे पितळ उघड पडले आहे.