आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

<p>आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन</p>

कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त आज राजेंद्रनगर परिसरातील नगरसेविका अर्चना बिरांजे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप बिरांजे यांच्यावतीने जय भवानी मंडळ परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्ष नेते राजू लाटकर, नगरसेविका अर्चना बिरांजे, नगरसेवक प्रवीण केसरकर, राजू साबळे आणि शशिकांत पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. लोटस हॉस्पिटल आणि भारती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरात नेत्र तपासणी, सीबीसी, कॅल्शियम आणि थायरॉईड चाचण्यासह इतर तपासण्या करण्यात आल्या.

दिवसभरात पाचशेहून अधिक लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उदय कांबळे, बंटी हवालदार, दयानंद गालफाडे, नागेश शिंदे, रोहित कांबळे, रचन सूर्यवंशी, विजय सकट, तानाजी मिसाळ, मीना कांबळे, शुभम सूर्यवंशी आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.