आ. सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळमधील जनावरांना चारा
कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार आज आमदार पाटील यांच्या वाढदिनी मार्केट यार्ड येथील वारके कुटुंबियांच्यावतीने पांजरपोळ येथील जनावरांना चारा देण्यात आला. यावेळी शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके, महेश वारके, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते राजू लाटकर, नगरसेवक विनायक फाळके, राजू साबळे, संदीप बिरांजे, शशिकांत पाटील, विजय कांबळे, भेय्या शेटके डॉ. महादेव मोरे, संजय पोवार वाईकर, बाजार समिती संचालक कुमार अहुजा, भरत रसाळे, राजेंद्र वारके, सुनील तोंदकर, कृष्णात भुसारे, अरविंद वर्धमाने, मंगल वारके, पद्मजा वारके, उमा वारके उपस्थित होते.