आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सडोली खालसा जिल्हा परिषद मतदार संघातील शाळांना वॉटर फिल्टरचं वाटप

<p>आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सडोली खालसा जिल्हा परिषद मतदार संघातील शाळांना वॉटर फिल्टरचं वाटप</p>

कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातायत. या निमित्तानं विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सडोली खालसा जिल्हा परिषद मतदार संघातील तब्बल पंधरा शाळांमध्ये आर.ओ. वॉटर फिल्टरचं वितरण करण्यात आलंय. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या वॉटर फिल्टरचं आज अजिंक्यतारा कार्यालयात वाटप करण्यात आलं. हा उपक्रम रोहित पाटील यांच्या सहकार्यानं राबवण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्जेराव भोसले यांनी आमदार सतेज पाटील यांच्या विधायक कामाचं कौतुक केलं भविष्यात राज्याचं नेतृत्व त्यांच्या हाती यावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, बयाजी शेळके, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, उदय पाटील सडोलीकर, तानाजी भोसले, विनायक तळेकर, युवराज पाटील, सर्जेराव भोसले, सचिन पाटील, रघुनाथ चव्हाण, संदीप गायकवाड, लखन भोगम, प्रदीप पाटील, युवराज भोसले, डी. एम. पाटील, शौकत मुल्लानी, शंभू परीट आदी उपस्थित होते.