आ. सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त उपनगर वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं स्वच्छता मोहिम

<p>आ. सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त उपनगर वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं स्वच्छता मोहिम</p>

कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 54 वा वाढदिवस उद्या रविवारी साजरा होतोय .. दरवर्षी आमदार सतेज पाटील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वरूपात वह्या स्वीकारतात. वाढदिवसानिमित्त संकलित केलेल्या वह्यांचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतं. दरवर्षी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याचाच भाग म्हणून उपनगर वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं उपनगरातील प्रभाग क्रमांक 9 आणि 20 मध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकत्यांनी अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसर, चिवा बाजार चौक, क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक, आपटेनगर, साने गुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर, देवकर पाणंद चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवून उपनगरातील कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं हा आगळावेगळा उपक्रम राबवल्याचं नगरसेवक राहुल माने यांनी सांगितलं.

या स्वच्छता मोहिमेत बबन राणगे, मेघना गावंडे, महादेव मोरे, अमोल माने, सुनील देसाई, गौरव सावंत, प्रवीण पाटील, विशाल दिंडोर्ले, युवराज तेली, अभिजित देठे, महेंद्र उर्फ बाबा कोरडे, गणेश मोरे, गजानन विभुते, विजय कांबळे, श्रीकांत मोरे, रवी राऊत, विलास आंबोळे, भीमराव देसाई, विलास बारड, सूर्यकांत पाटील, यशवंत शिंदे, धनंजय बोंगाळे, महादेव येटाळे, परसू वीर यांच्यासह प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 20 मधील सतेज पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.