‘या’ निर्णयामुळे राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहांना मोठा दिलासा...

<p>‘या’ निर्णयामुळे राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहांना मोठा दिलासा...</p>

मुंबई - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यापारी एलपीजीचा अतिरिक्त 20 टक्के पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. 
त्यानुसार केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी, 21 मार्च रोजी जारी केलेल्या सूचनांनुसार, यापूर्वी राज्याला 30 टक्के एलपीजी वाटप मंजूर होते. आता उद्या 23 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त 20 टक्के वाटप वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण गॅस पुरवठा हा पूर्वीच्या संकटपूर्व पातळीच्या सुमारे 50 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.