एस फोर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कर्तबगार महिलांचा सन्मान... 

<p>एस फोर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कर्तबगार महिलांचा सन्मान... </p>

कोल्हापूर - एस फोर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उजळाईवाडीमध्ये  समाजातील कर्तबगार महिला आणि मुलींचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी पाककला, पारंपारिक वेशभूषा, केशभूषा, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देवून सन्मान करण्यात आले.

यावेळी करवीर पंचायत समिती सदस्या डॉ. शिल्पा हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.  दरम्यान पाककला स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या रुपाली सावंत,  व्दितीय क्रमांकाच्या छाया नाईक, तृतीय क्रमांक गायत्री चिखलकर,वेशभूषा स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक माधुरी दळवी, द्वितीय क्रमांक शारदादेवी पोवार, तृतीय क्रमांक अनुष्का पाटील, केशभुषा स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक ज्योती मिठारी, दिव्तीय क्रमांक साक्षी पाटील,तृतीय क्रमांक अनुष्का पाटील, वकृत्व स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक सरस्वती विजय गायकवाड, द्वितीय क्रमांक स्मिता सतीश नावलगी, तृतीय क्रमांक किर्ती गायकवाड, होम मिनिस्टर स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक प्रिया पोलादे, द्वितीय क्रमांक पूजा खर्डेकर,तृतीय क्रमांक राजश्री धाराशिवकर आदींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना गौरवण्यात आले. 
या प्रसंगी जि.प.सदस्या संगीता यादव, तंटामुक्त समिती अध्यक्ष नायकू बागणे, माजी जि.प.सदस्य मनिषा संजय वास्कर, नगरसेविका शुभांगी शशिकांत पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक उमेश पवार, कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य प्रवीण केसरकर, नगरसेविका धनश्री महेश कोरवी, माजी ग्रामपंचायत सदस्या वैशाली सुतार, वैशाली लांडगे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पंडित, ग्रामपंचायत सदस्य विनायक बागणे, ग्रामपंचायत सदस्य अशोक लांडगे, कार्यक्रमाचे आयोजक एस राजू माने, कार्यक्रमाचे आयोजक प्रियांका माने, माजी करवीर पंचायत समिती सदस्या अरुणिमा सुनिल माने, प्रतिक माने, एकनाथ माने,शशिकांत माने, नारायण दळवी, विकास यादव, योगेश्वर मछले, आदित्य दळवी, निलेश कोळी, दत्तात्रय माने, रुपेश घडशी, प्रदीप दुगाणे यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते.