इराण – इस्रायल युद्धाचा परिणाम कोल्हापुरावरही...
शहरात सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा
कोल्हापूर – सध्या आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम कोल्हापूर शहरात जाणवू लागला आहे. युद्धामुळे घरगुती गॅसचे दर वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील लोकांनी गॅस एजन्सीच्या दारासमोर सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्या परिसरात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.