परीख पूल परिसरातील रस्ता उद्यापासून पुढील ४५ दिवस राहणार बंद...

<p>परीख पूल परिसरातील रस्ता उद्यापासून पुढील ४५ दिवस राहणार बंद...</p>

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने  कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील परिख पुलाजवळ काँक्रिट रस्ता आणि गटरीचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम सुमारे ४५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहणार आहे. या कामासाठी उद्या, गुरूवारपासून मध्यवर्ती बसस्थानक, परिख पुल ते टाकाळा हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच, कामाच्या टप्प्यानुसार मध्यवर्ती बसस्थानक, आर. एल. ज्वेलर्स ते परिख पुल मार्गे राजारामपुरीकडे जाणारी वाहतूकही आवश्यकतेनुसार बंद केली जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.

वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी तसेच पादचारी आणि वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.