परिख पुल परिसरात वाहतुकीत तात्पुरता बदल

<p>परिख पुल परिसरात वाहतुकीत तात्पुरता बदल</p>

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका तर्फे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील परिख पुलाखाली काँक्रिट रस्ता व गटर काम हाती घेण्यात येत असून हे काम सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांनी दि. ५ मार्च २०२६ पासून मध्यवर्ती बसस्थानक–परिख पुल–टाकाळा हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांनी दाभोळकर कॉर्नर व गोकुळ हॉटेल मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा.

राजारामपुरीकडून बसस्थानकाकडे येणारी वाहतूक सध्या सुरू राहणार असून कामाच्या प्रगतीनुसार बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे .