परदेशात अडकलेल्या नागरिकांचं पहिलं विमान मुंबईत दाखल...अनेकांनी घेतला सुटकेचा निश्वास
मुंबई - इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशात भारतातील अनेक नागरिक विमान सेवा बंद असल्याने अडकले आहेत. त्यापैकी पहिलं विमान मुंबईत दाखल झाले आहे. सोमवारी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान मुंबईत हे विमान पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मागील तीन दिवस दुबईत अडकलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच उर्वरित लोकांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.