खळबळजनक  : राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना जीवे मारण्याची धमकी 

<p>खळबळजनक  : राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना जीवे मारण्याची धमकी </p>

मुंबई – आपलं परखड मत स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध असणारे राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तरीही त्यांनी मोदी सरकार आणि अन्यायाविरोधात बोलणं थांबवलं नाही. फेसबुकवर अमृतम गमया या नावाच्या व्यक्तीने ‘तुझेही  गौरी लंकेश लवकरच करावं लागेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
परुळेकर हे एक लेखक, तज्ज्ञ, पत्रकार, कवी, संशोधक आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, मासिके आणि अनेक नियतकालिकांसाठी स्तंभलेखन केले आहे. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेबद्दलचे कठोर सत्य समोर आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.