जयरामबापूंचं प्रेरणादायी स्मारक उभारा, पुतळा मी देतो - आ. सतेज पाटील
आ. सतेज पाटील यांनी केलं माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या कुटुंबियांचं सांत्वन
कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांचं नुकतंच निधन झालं. आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे युवा नेते विजय पाटील, भीमराव पाटील, अजय पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी जयराम बापूंचं शहरासाठीचं योगदान खूप मोठं होतं. त्यांचं कार्य आणि विचार अजरामर राहण्यासाठी कुरुंदवाडमध्ये भव्य स्मारक उभारावं, स्मारकासाठी माझं पूर्ण सहकार्य राहील. बापूंचा पुतळा मी स्वतः देतो अशी ग्वाही आ. सतेज पाटील यांनी दिली. बाईट आ. सतेज पाटील कुरुंदवाड शहर आणि शिरोळ तालुक्यातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्मारकासाठी समिती स्थापन करून बापूंचं प्रेरणादायी स्मारक उभारणीच्या कामासाठी पुढं यावं असं आवाहन आ. सतेज पाटील यांनी केलं.
यावेळी शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दरगू गावडे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अनंत धनवडे, नितीन बागे यांच्यासह नगरसेवक तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.