होळी लहान करा, शेणी दान करा - महापौर रुपाराणी निकम यांचे आवाहन
कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा सोमवार, दि. 2 मार्च 2026 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी शहरवासीयांना केले आहे.
महापौर रुपाराणी निकम यांनी होळीचा सण आनंदाने साजरा करुन पर्यावरणाचे संरक्षण करा. यामध्ये होळी लहान करुन आपले डांबरी रस्ते खराब होणार नाहीत याची दक्षता घ्या. तसेच होळी लहान करुन वाचलेल्या शेणी महापालिकेच्या स्मशानभुमीस दान करा. यासाठी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार (9766532044) व 0231-2540290 या नंबरवर संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.