किशोरवयीन मुलींसाठी कोलोलीत लोकसहभागातून पिंक रुमची सुरुवात...

 जिल्हापरिषदेचे सीईओ एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते रुमचे उद्घाटन

<p>किशोरवयीन मुलींसाठी कोलोलीत लोकसहभागातून पिंक रुमची सुरुवात...</p>

कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील कोलोलीमध्ये लोकसहभागातून किशोरवयीन मुलींसाठी पिंक रुम उभारण्यात आली  आहे. या पिंक रुमचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तीकेयन आणि पन्हाळा पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या हस्ते करण्यात आले .
या पिंक रुमच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेबाबत  माहिती दिली जाणार आहे.  केंद्र शाळा कोलोली आणि  ग्रामपंचायत कोलोलीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या, केंद्र शाळा कोलोलीचे  सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष, विकास पाटील, किरण मस्कर, केंद्र प्रमुख ठाणेकर, पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.