पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य - अतुल देऊळगावकर

<p>पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य - अतुल देऊळगावकर</p>

कोल्हापूर – सध्याचा विकास म्हणजे सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण आहे. त्याची पुनर्मांडणी होऊन त्यात जीवनवाद यायला हवा. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असे प्रतिपादन अतुल देऊळगावकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'साहित्य, संस्कृती, विज्ञान, माध्यमे आणि शाश्वत विकास' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

यावेळी बोलताना पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी, ब्रिटिश राजवटीपूर्वी जलव्यवस्थापन, शेती, उद्योग, समृद्ध होते. ब्रिटिश राजवटीनंतर त्यांनी सर्व मूलभूत संरचनेवर अतिक्रमण केले आहे. तेव्हापासून पर्यावरणाच्या ऱ्हासाला सुरुवात झाल्याचे सांगितले. तसेच उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नाही तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवर होतोय. आपण स्मार्ट सिटी तयार करण्यावर भर देतोय पण स्मार्ट शहरांमध्ये पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले जाणे गंभीर असल्याचे देऊळगांवकर यांनी सांगितले.

यावेळी पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, हिंदी विभाच्या प्रभारी प्रमुख प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी, सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर, डॉ. सुमेधा साळुंखे, लक्ष्मी फाउंडेशनचे विनायक देसाई, ज्येष्ठ आर्किटेक्ट शिरीष बेरी, सौ. बेरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ संपादक रावसाहेब पुजारी, राजश्री साकळे, डॉ. अविनाश भाले, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. गीता दौडमणी, डॉ. सुवर्णा गावडे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.