पट्टणकोडोलीतील जलजीवनाच्या जलकुंभाला मुहूर्त कधी लागणार ? ; पाण्याविना ग्रामस्थांचे हाल

<p>पट्टणकोडोलीतील जलजीवनाच्या जलकुंभाला मुहूर्त कधी लागणार ? ; पाण्याविना ग्रामस्थांचे हाल</p>

कोल्हापूर - ग्रामीण जनतेला शुध्द आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमधून गावा गावांमध्ये नळपाणी पुरवठा योजना साकारण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनमधील नळपाणी पुरवठा योजना यशस्वीरित्या सुरु आहेत पण पट्टणकोडोली गावातील योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळताना दिसत नाही. गावातील राजर्षी शाहू बेघर वसाहती मध्ये जलकुंभ उभारण्यात आला आहे. परंतु या जलकुंभात गेल्या दीड वर्षात एकदाही पाणी साठवून बेघर वसाहतीला त्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील लोकांना विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. जलजीवन मिशनचा निधी मिळून सुध्दा ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असेल तर योजनेवर झालेला खर्च कुणाच्या हिताचा असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.