लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात

<p>लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात</p>

कोल्हापूर - चांगभलंच्या गजरात आज जोतिबाच्या खेट्यांना सुरूवात झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाईनं अनवाणी चालत येवून श्री जोतिबाच्या दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. जोतिबा देवाला घातल्या जाणाऱ्या पाच खेट्यां मागं हीच परंपरा असल्याचं सांगितलं जातंय.

कोल्हापूर शहरा बरोबरच आता महाराष्ट्र, आणि कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेनं खेटे यात्रेत सहभागी होतायत. आज पहिला खेट्याला महाराष्ट्र, कर्नाटकातून लाखोच्या संख्येनं आलेल्या भाविकांनी जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भावीकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. सकाळी ८ ते ९ अभिषेक, त्यानंतर धुपारती, आणि रात्री पालखी सोहळा संपन्न झाला. आज जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.