जिल्ह्यातील २० हजार ग्राहकांचे रेशन झाले बंद..!

<p>जिल्ह्यातील २० हजार ग्राहकांचे रेशन झाले बंद..!</p>

कोल्हापूर – जिल्ह्यातील २० हजार ३१० केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकधारकांचे रेशन जिल्हा पुरवठा विभागाने बंद केले आहे. यामध्ये काही शासकीय नोकर, ज्यांनी गेल्या सहा महिन्यांत धान्य घेतलेले नाही आणि मृत व्यक्तींचा समावेश आहे. 

राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील धान्य न घेणाऱ्या किंवा शासकीय सेवेत असणाऱ्या रेशन ग्राहकांची एक सुची जिल्हा पुरवठा विभागाला पाठविली आहे. या यादीचा आढावा घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने २० हजार ३१० ग्राहकांचे रेशनचे धान्य बंद केले आहे. यांच्यापैकी कोणी पुन्हा धान्य सुरू करण्याची मागणी केली, तर ते निकषांत बसतात का, हे पाहून पुन्हा त्यांना धान्य सुरू केले जाणार आहे.