३४ जिल्हा परिषदेपैकी ‘कोणत्या’ जिल्हा परिषदेला कोणतं आरक्षण जाहीर... जाणून घ्या एका क्लिकवर...

मुंबई - ग्रामविकास विभागाने नुकताच राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यापैकी ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील अध्यक्षपद सर्वसाधारणसाठी जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाची यादी पुढीलप्रमाणे :-
पालघर - अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग - सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव - सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली - सर्वसाधारण (महिला)
सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड - अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर - सर्वसाधारण (महिला)
अमरावती - सर्वसाधारण (महिला)
अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
परभणी - अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया - सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)