कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर...इच्छुकांच्या हालचालींना वेग

<p>कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर...इच्छुकांच्या हालचालींना वेग</p>

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचे ग्रामविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे, त्यासाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. 
जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता मातब्बर नेतेमंडळींच्या पत्नी, सुना निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीची प्रभाग रचना निश्चित झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते तर आता सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे  अनेक मातब्बर या अध्यक्षपदासाठी रिंगणात असणार आहेत.