‘सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणारच’ : मनोज जरांगेंचा इशारा 

<p>‘सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणारच’ : मनोज जरांगेंचा इशारा </p>

बीड – आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा आज बीडमध्ये मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणार आणि ते पण ओबीसीतूनच घेणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी आयुष्यपणाला लावलंय, उद्या आरक्षणासाठी अंगाचं कातडं जरी फडणवीसांनी मागितलं तरी ते देणार. जातीसाठी मरण आलं तरी बेहत्तर, मी मरायला घाबरत नाही. सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे, पण यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, असं मनोज जरांगे यांनी बीडच्या मराठ्यांना संबोधित करताना म्हटले आहे.