अंबाबाई दर्शन : भाविकांनी रविवारी ओलांडला ८१ हजारांचा टप्पा...
कोल्हापूर – गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सुट्ट्यांमुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी खूप वाढली आहे. काल रविवारी 81 हजार 925 भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. उन्हाचा तडका असला तरी सुट्टी असल्याने भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत. शुक्रवारी 47 हजार 25 तर शनिवारी 69 हजार 425 भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.