नववर्षानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात उभारली गुढी...
कोल्हापूर - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज सकाळी गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षानिमिताने गुढी उभारण्यात आली .
आज दिवसभर देश - विदेशातील भक्त श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात. त्यामुळे सकाळपासून भक्ताच्या मोठ्या रांगा मंदिरात पहायला मिळत आहेत. हिंदू पंचांगानुसार आज वर्षाचा पहिला दिवस असल्याने नवीन संकल्प करत आणि नव्या कामाची सुरुवात चांगली होण्यासाठी भक्त देवीच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत.