करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या गर्भगृहाच्या संवर्धनाचे काम पूर्ण... उद्यापासून दर्शन सुरु

<p>करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या गर्भगृहाच्या संवर्धनाचे काम पूर्ण... उद्यापासून दर्शन सुरु</p>

कोल्हापूर - पुरातत्व विभागाने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील श्री. अंबाबाई, श्री महाकाली, श्री महासरस्वती या तिन्ही देवींच्या गर्भगृहाच्या अंतर्बाह्य संवर्धनाचे काम हाती घेतले होते. हे कामासाठी गाभारा दर्शन बंद ठेवण्यात आले होते. पितळी उंबऱ्याजवळ उत्सवमूर्त आणि मंगल कलश दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होते. संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उद्या बुधवारी सकाळी साडे आठच्या आरतीनंतर गाभारा दर्शन पूर्ववत सुरु होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली.

गाभाऱ्याच्या कामानंतर आता मंदिराच्या बाहेरच्या कामांना उद्यापासून सुरु करण्यात येणार असल्याचेही नाईकवाडे यांनी सांगितले आहे.