जोतिबाची पाकळणी उत्साहात साजरी...
कोल्हापूर - जोतिबा देवाची दर रविवारी खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले होते. त्यामुळे मंदिर परिसरात आणि शिखरावर गुलाल खोबऱ्याचा थर साचला होता. त्यांची स्वच्छता करण्यात आली. चैत्र यात्रा १ एप्रिल रोजी होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाकाळणी पार पडली. सकाळी पाण्याचे फवारे मारून मंदिराची स्वच्छता करण्यात आली. जोतिबा मंदिरातील शिखरे, दीपमाळा, दगडी कमान, देवताकृत्य साहित्याची स्वच्छता करण्यात आली. पुजाऱ्यांनी जोतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांची आभूषणे, मंदिराची शिखरे आणि इतर साहित्यांची स्वच्छता केली. करण्यासाठी जोतिबा देवस्थान समितीचे कर्मचारी, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते. जोतिबा मंदिरात चैत्र यात्रेपूर्वी, चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वी अशी तीनवेळा स्वच्छता केली जाते यालाच पाकाळणी असेही म्हटले जाते.