श्री स्वामी समर्थ दुर्गसंवर्धन मंडळाचे श्रमदान...चक्रेश्वर मंदिर परिसर केला चकाचक
कोल्हापूर - महाशिवरात्री यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी चक्रेश्वर डोंगर आणि मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे ढीग साचले होते. मात्र स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर कसबा तारळेतील श्री स्वामी समर्थ दुर्गसंवर्धन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता श्रमदान करत हा कचरा गोळा करून परिसर चकाचक केला.