मुरगूड-मुदाळतिट्टा रस्त्यावर वाहतूक कोंडी... 

बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह प्रवाशांना त्रास

<p>मुरगूड-मुदाळतिट्टा रस्त्यावर वाहतूक कोंडी... </p>

कोल्हापूर -  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूरमधील बाळूमामांच्या दर्शनासाठी प्रत्येक अमावस्येला भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. आज सुट्टीचा दिवस असल्याने राधानगरी - निपाणी रस्त्यावर मुरगूड-मुदाळतिट्टा रस्त्यावर सात किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. प्रत्येक अमावस्याला येणाऱ्या भक्तांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत असते. देवस्थान समितीच्यावतीने सध्या असलेली पार्किंग व्यवस्था अपुरी ठरत आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रशस्त पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. प्रशासनाच्यावतीने कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे भाविकांसह प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.