‘या’ प्रकरणी पवार कुटुंबाला दिलासा...हायकोर्टानं सीबीआय चौकशी फेटाळली 

<p>‘या’ प्रकरणी पवार कुटुंबाला दिलासा...हायकोर्टानं सीबीआय चौकशी फेटाळली </p>

मुंबई - लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी  मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने  फेटाळून लावली आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. 
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पाच्या निर्मितीत भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर झाल्याच्या आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध एक याचिका दाखल करण्यात आली होती.