उंचगावमधील साकव कामाचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ...

<p>उंचगावमधील साकव कामाचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ...</p>

कोल्हापूर - उंचगाव ग्रामपंचायत हद्दीतील माने पार्क, यादव वाडी येथे  साकव बांधण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून विशेष घटक योजनेतून साठ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या ठिकाणी सध्या असणारा साकव हा अरुंद आणि कमी उंचीचा आहे, त्यामुळे पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरत होते. या नवीन साकवामुळे ही समस्या कायमची दूर होणार आहे. त्यामुळे भागातील नागरिकांनी मागणी पूर्ण झाल्याबद्दल आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना धन्यवाद दिले. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेत उंचगांव मधील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच श्रीधर कदम, सदस्या वैजयंती यादव, मयुरा चव्हाण, सुनीता चव्हाण, शिला मोरे, सदस्य अरविंद शिंदे, राहुल मोळे, उंचगाव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब यादव, सचिन गाताडे, तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष दत्ता यादव, मधुकर चौगले, कीर्ती मसुटे, संभाजी यादव, अजित माने, सुरज पाटील, अनिल दळवी, दर्शन अटकर, वैभव कांबळे, रोहित माने, शीतल शिंदे, राणी यादव, अनिल यादव, श्यामराव यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मणेर मळा ते महालक्ष्मी नगर दरम्यान विद्युत पोल उभारण्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी अतुल सुतार, गौरव देसाई, विजय घोडके, अजित माने यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भागातील नागरिक उपस्थित होते.