निवडणूकीत पैसे वाटावेच लागतात : प्रफुल्ल पटेल यांचं खळबळजनक वक्तव्य
मुंबई – सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुकीत पैसे वाटण्यावरून खळबळजनक वक्तव्य केले आहे.
प्रफुल पटेल म्हणाले की, निवडणुकीमध्ये पैसे वाटावेच लागतात आणि पैसे वाटले तरी मतदार पैसे घेऊन ज्याला मत द्यायचं त्यालाच देतात. मागील काळामध्ये किती बाहुबलींना आम्ही निवडून दिले आहे याची आम्हाला माहिती आहे. निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी केवळ पैशांचा आधारे कोणीच निवडून येत नाही. लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं असतं त्यांनाच ते देतात. समजनें वालों को इशारा काफी हैं, असे म्हटले आहे