"एक दिवा झाडांसाठी..." त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनोखा पर्यावरण उपक्रम
कोल्हापूर - मंगळवारी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी, वृक्षप्रेमी ग्रुप, गोळीबार मैदान आणि पोलीस ग्रुप कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त "एक दिवा झाडांसाठी..." हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो. यावर्षी हजारो युवक-युवती, पर्यावरणप्रेमी, अबालवृद्ध यांनी या कार्यक्रमास भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदविला.
या वृंदावन परिसरात २००० हून अधिक औषधी, समाजोपयोगी आणि दुर्मिळ झाडांचे रोपण करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी पर्यावरण मित्र डॉ. मधुकर बाचुळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
अशा उपक्रमांमुळे निसर्गप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि हरित कोल्हापूर या संकल्पनेला नवी उभारी मिळत आहे, असे प्रा. बसवंत पाटील यांनी सांगितले.