नवीन वर्षात राज्यात ‘आपलं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबवणार : ना. प्रकाश आबिटकर
कोल्हापूर – नवीन वर्षात १ जानेवारीपासून ‘आपले गावे आरोग्य संपन्न गाव’ अभियान संपूर्ण राज्यात राबवणार असल्याची घोषणा मंत्री आबिटकर यांनी केली.राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध विकास कामांचे उदघाटन नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी मंत्री आबिटकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री सूर्य घर योजना, वॉटर बेल, ग्रामपंचायत संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री आबिटकर यांनी, गाव एकसंघ राहिले तर विकासाची वाटचाल सोपी होते असे सांगितले.
जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील, प्रमोद तौंदकर, ग्रामपंचायत अधिकारी सचिन बारड, साताप्पा शेरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सरपंच योगिता वारके, युवराज वारके, सचिन वारके, उपसरपंच रत्नावली खोत, सुनील वारके, जयसिंग बिडकर, दयानंद कांबळे, विक्रम वारके आदी उपस्थित होते.