जोपर्यंत अधिसूचना निघत नाही, तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा सुरूच राहणार : आ. सतेज पाटील

<p>जोपर्यंत अधिसूचना निघत नाही, तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा सुरूच राहणार : आ. सतेज पाटील</p>

कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये अनौपचारिक गप्पा मारताना, शक्तीपीठ महामार्गाचे अलाईनमेन्ट बदलण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये बदल केला जाऊ शकतो. यासंदर्भात विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर आ. सतेज पाटील यांनी, मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पा मारताना हे वक्तव्य केले असले तरी याबाबत जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

विधानसभेच्या निवडणुकावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात, जमीन संपादनाचे आदेश काढण्यात आल्याकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांनी हा अनुभव घेतलाय त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले आहे काय? अशी शंका आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली आहे.