महिला डॉक्टर आत्महत्या : ‘त्या’ दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन : मुख्यमंत्र्यांचा आदेश
सातारा – फलटणमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर पोलीस यंत्रणेसह मंत्र्यांकडून जलद कारवाई करण्यासाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. या आत्महत्येमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांची नावे समोर आली आहेत ते सध्या फरार झाले आहेत. ‘त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.