महिला डॉक्टर आत्महत्या : 'कोणी अधिकारी असला तरी, त्याला सोडणार नाही : मंत्री शंभूराज देसाई 

<p>महिला डॉक्टर आत्महत्या : 'कोणी अधिकारी असला तरी, त्याला सोडणार नाही : मंत्री शंभूराज देसाई </p>

सातारा – फलटणमधील शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  या घटनेनंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी, साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना स्वतः घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे आणि सर्व पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच 'कोणी अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाऊन कठोर कारवाई करू,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.