राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीचे नाव रातोरात बदलले...आ. गोपीचंद पडळकरांचा जाहीर पाठिंबा
सांगली –सांगली जिल्ह्यातील जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीचे अज्ञातांनी रातोरात नामकरण करत नवीन फलक लावला आहे. 'राजाराम बापू पाटील' हे नाव बदलून आता तिथे ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा फलक झळकला आहे. याला आ. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
'हा कारखाना सभासदांच्या पैशातून उभा राहिला असून, जयंत पाटलांनी तो ढापला आहे. तालुक्यातील २२ हजार शेतकरी सभासदांच्या भावना अत्यंत तीव्र आहे की हा कारखाना सभासदांचा झाला पाहिजे,' असे पडळकर म्हणाले आहेत. शेतकऱ्यांनीच तीव्र भावना व्यक्त करत हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई लढण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.