नरकासूराचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत -उद्धव ठाकरे 

<p>नरकासूराचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत -उद्धव ठाकरे </p>

मुंबई - आज नरक चतुर्दशी आहे, कृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर कोण हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. आता हा प्रवाह सुरु झाला आहे. जे मतचोरी करुन तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला  आहे. आज भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. 
या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसं,आणि  अमराठीही एकत्र आले आहेत. कारण कुणालाच हे आवडलेलं नाही, असेही ते म्हणाले.