माजी खासदार महादेवराव शिवणकर यांचे निधन...

गोंदिया - माजी वित्तमंत्री, माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेव शिवणकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. महादेवराव शिवनकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला होता.
त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये सिंचन मंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.